पुणे

कवठे येमाई परिसरासाठी वीज उपकेंद्र मंजूर करणार

CD

कवठे येमाई, ता. २६ : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र मंजूर करण्यात येणार आहे.
कवठे येमाई, सविंदणे, मलठण आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी आणि स्थानिक उद्योजक हैराण झाले आहेत. त्यामुळे या भागात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसराला मलठण येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, औद्योगिक आणि शेती वापरासाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेता, सध्याचा वीजपुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर व पुरेशा दाबाने न मिळाल्याने शेती कामांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात कवठे येमाई, सविंदणे, मलठण, रावडेवाडी, निमगाव भोगी, आमदाबाद तसेच आंबेगाव तालुक्यातील काही गावे येतात. या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण सुरू असून, नियमित वीजपुरवठा न झाल्यास स्थानिक उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कवठे येमाई परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. त्यां या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच कवठे येमाई परिसरात स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात येईल, तसेच त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे गावडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT