पाबळ, ता. १ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौदा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग अनंता पुंडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीबाबत वाद सुरू असून न्यायालयात दावा प्रलंबित आहे. या जमिनीवर पेरणी करण्याच्या उद्देशाने नाथा बबन उमाप हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह गेले होते. दरम्यान, जमिनीवर हक्क सांगत पांडुरंग पुंडे यांच्या गटाकडून विरोध करण्यात आला आणि दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दगड आणि लाकडी दांडक्यांचा वापर करून परस्परांवर हल्ला करण्यात आला. या झटापटीत काही जण जखमी झाले असून या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पांडुरंग अनंता पुंडे (वय ६५, रा. कान्हूर मेसाई) व नाथा बबन उमाप (वय ३७, रा. जातेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाथा बबन उमाप, सोमनाथ अंकुश मुरकुटे, बेबीबाई बबन उमाप, सविता दत्तात्रेय शिवले, विक्रम उमाप, समीर उमाप, रोशन शिवले (सर्व रा. जातेगाव बुद्रुक), तसेच पांडुरंग अनंता पुंडे, अनिल पांडुरंग पुंडे, सुनील पांडुरंग पुंडे, सारिका पांडुरंग पुंडे, स्वाती अनिल पुंडे, उज्ज्वला पांडुरंग पुंडे (सर्व रा. कान्हूर मेसाई) आणि राहुल धुमाळ (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर आणि पोलिस हवालदार संतोष शेळके करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.