पुणे

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

CD

कवठे येमाई, ता. १७ : पुढे चाललेल्या ट्रकवर मागून येणारा दुधाचा टॅंकर आदळल्याने टॅंकरच्या पुढील भागात बसलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. कवठे येमाई (ता. शिरूर) गावच्या हद्दीत काळुबाईनगर येथे रविवारी (ता. १७) पहाटे अष्टविनायक महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक व टॅंकरचालकासह काहीजण जखमी झाले.
शांताबाई मकाजी वाजे (वय ६८), त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय ३८) व नातू युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय ५) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मूळचे वडनेर बुद्रूक (ता. पारनेर) येथील रहिवासी असलेले वाजे कुटुंबीय सध्या मुंबईत वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका नातेवाइकाच्या वर्षश्राद्धासाठी ज्ञानेश्वर वाजे हे आई व छोट्या मुलासह दूध वाहतूक करणाऱ्या टॅंकरमधून (क्र.एमएच १६ सीडी ९८१९) निघोज (ता. पारनेर) येथे निघाले होते. अष्टविनायक महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत बंटी ढाब्याजवळ पुढे चाललेल्या ट्रकवर (क्र. एमएच ४२ बी ८८६६) टॅंकर आदळून हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या मागील बाजूने शिरलेल्या दूधाचा टॅंकर स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. यात टॅंकरच्या दर्शनी बाजूचा चक्काचूर झाला असून त्यात ज्ञानेश्वर वाजे हे आई व मुलासह अडकले होते. वाहने बाजूला केल्यानंतर युवांश जागीच मृतावस्थेत पडला होता. गंभीर जखमी अवस्थेतील ज्ञानेश्वर व शांताबाई यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांचाही मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते ट्रक रस्त्याकडेला थांबवून चालक लघुशंकेसाठी गेला होता त्यावेळी हा अपघात झाला. तर काहींच्या मते रस्त्याकडेला थांबलेला ट्रक चालकाने सुरू करून अचानक रस्त्यावर आणल्याने दूधाचा टॅंकर त्यावर आदळला. उपनिरीक्षक पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT