पुणे

पाबळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील रोहित्र फोडले

CD

पाबळ, ता. ७ : पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेले विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा रक्षक नियुक्त असतानाही चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रात्री रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा रक्षक नियुक्त होते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांनी दिली. मात्र, सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी कशी घडली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रुग्णालय अनेकदा ओस पडलेले असते. बहुतांश वेळा प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात, असेही स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. चोरीच्या घटनेची माहिती महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धस यांनी सांगितले. याबाबत महावितरणच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT