पुणे

सविंदणे- कवठे येमाई रस्त्याचे काम रखडले

CD

कवठे येमाई, ता. ३० : सविंदणे ते कवठे येमाई (ता. शिरूर) या पाच किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या पंधरा महिन्यांपासून निधीअभावी रखडले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण होण्याआधीच त्याची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यावर टाकलेल्या खडीचा थर जागोजागी उखडू लागला असून, खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांमधून या अपूर्ण कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हा रस्ता परिसरातील नागरिकांना शेतमालाची वाहतूक व दैनंदिन ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पुढे कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गाला व लोणी (ता. आंबेगाव) येथे बेल्हे-जेजुरी महामार्गाला जोडला जात असल्याने दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी उखडून खड्डे पडू‌ लागल्याने दुचाकीस्वारांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही ठिकाणी रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. निधीअभावी काम रखडले असले, तरी अर्धवट कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे?, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्याचे काम तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.


सविंदणे ते कवठे येमाई या रस्त्याचे काम निधीअभावी रखडले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित कंत्राटदारास काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
-श्रीपाद बलशेठवार, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे
--------------------

रस्त्याचे नाव - सविंदणे ते कवठे येमाई रस्ता
• अंतर - ५ किलोमीटर
• अंदाजपत्रकीय किंमत - २ कोटी ४८ लाख
• ठेकेदाराचे नाव - मे. एम. एस. पंजाबी (पुणे)
• कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) - १४ ऑक्टोबर २०२४
• कामाला प्रत्यक्ष सुरुवात : २ नोव्हेंबर २०२४
• काम पूर्ण करण्याचा कालावधी - १२ महिने
• कामाची सद्यःस्थिती - एमपीएमपर्यंत पूर्ण (उर्वरित अपूर्ण)
• विलंबाचे कारण - सध्या निधी उपलब्ध नाही.

निधी वापर व आर्थिक स्थिती
• कामाचे एकूण बिल - २ कोटी १४ लाख
• अदा केलेली रक्कम - ४६ लाख
• प्रलंबित देयके - १ कोटी ६८ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीस कोर्टात आणताना महिलांनी चोपले

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

SCROLL FOR NEXT