पुणे

दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

CD

पाबळ, ता. १ : पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत.
पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल व आजदेखील या दाम्पत्यामध्ये भांडण झाले होते. आज सकाळच्या सुमारास भाग्यश्री ही आपल्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन सायकलवर घराबाहेर पडली. मात्र, दुपारपर्यंत ती घरी न परतल्याने पती राजू याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीजवळ सायकल व भाग्यश्री आणि तिच्या मुलांच्या चपला आढळून आल्या. त्यानंतर पतीने आरडाओरडा करीत स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, विशाल देशमुख, गणेश येळवंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने विहिरीतून महिलेसह दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेत अहिला उर्फ भाग्यश्री जाधव, तिचा सहा वर्षांचा मुलगा सार्थक व चार महिन्यांची मुलगी गौरी हे तिघे (सध्या रा. पाबळ ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बीबी ता. लोणार, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव (वय ३५, सध्या रा. एकेरी माळ, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. खडकी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठा गजबजल्या; रेडीमेड गुढींना वाढती मागणी

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT