पाबळ, ता. ५ : ‘‘माझ्या पाठीशी कोणताही मोठा राजकीय वारसा नाही. मात्र, सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाची शिदोरी आणि सर्व स्तरांतील जनतेचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. ही निवडणूक सत्तेसाठी नसून, सेवेची जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे, ’’असे पाबळ पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार दीपक खैरे यांनी सांगितले. समोर कितीही मोठे आव्हान असले तरी सामान्य माणसाने माझी उमेदवारी उचलून धरत निवडणूकीची सूत्रे हाती घेतल्याने माझा विजय निश्चीत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाबळ पंचायत समिती गणातील सर्व गावांचा दौरा आणि मतदारांच्या गाठीभेटीनंतर खैरे यांनी बैठकांमधून आपला विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला. आपला अजेंडा जनतेने स्वीकारला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाबळ परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून त्या डिजिटल तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, शासन आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न सोडवणे तसेच रस्ते व स्वच्छतेच्या प्रश्नावर भर देण्याचा निर्धार व तरूणांसाठी रोजगारनिर्मीती, स्पर्धा परीक्षा व क्रीडा शिबिरे आयोजित करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मांदळवाडी परीसरात दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. शेतीला पाणी नसल्याने हातची पिके जात होती. यास्थितीत दीपक खैरे यांनी पुढाकार घेऊन केवळ श्रमदानाचे आवाहन ग्रामस्थांना केले. उर्वरित आर्थिक भार स्वतः सोसला. पाच किलोमीटरवरून पाईपलाईन आणत विहिर खोदकाम करून त्यांनी वाडीत पाणी आणून दिले. त्यामुळे याभागात कृषीसमृद्धी साधली. त्या धर्तीवर परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सोडविण्याची खुणगाठ त्यांनी बांधली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.