कवठे येमाई, ता. ६ : चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये घडलेल्या अपघातात एका महिलेचे निम्मे शरीर कायमस्वरूपी निकामे झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पर्यटन केंद्राचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, करंदी (ता. शिरूर) येथील अश्विनी संदीप नप्ते (वय ३७) या आपल्या कुटुंबीयांसह सहलीसाठी चिंचोली मोराची येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात गेल्या होत्या. वॉटरपार्कमधील घसरगुंडीवरून खेळत असताना त्या पाण्यात कोसळल्या. मात्र, पाण्याची पातळी अपुरी असल्याने त्या जोरात आदळल्या व बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर कृषी पर्यटन केंद्रात वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याचे उघड झाले. वॉटरपार्क परिसरात रुग्णवाहिका किंवा प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमी अवस्थेतील अश्विनी यांना त्यांच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे निदान झाले असून, त्यांचे निम्मे शरीर कायमस्वरूपी निकामे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी किरण मल्हारी नप्ते (वय ३७, रा. चिंचवड- पुणे; मूळ रा. करंदी) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे मालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.