पुणे

कामचुकार कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा

CD

कवठे येमाई, ता. ११ : ‘‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सुपरवायझर यांनी कामकाजात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल,’’ असा कडक इशारा आंबेगाव-जुन्नर उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिला.
मलठण (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात शुक्रवारी (ता. १०) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सुपरवायझर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीत मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी व त्यांच्या माहितीचे नकाशीकरण (एसआयआर मॅपिंग) तसेच नव्या मतदारांची नोंद (प्रोजेनी) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, आंबेगावचे तहसीलदार सचिन वाघ, मलठण मंडल अधिकारी विजय फलके उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी कामाचा आढावा घेत शनिवार-रविवारी किमान ८० टक्के कामकाज वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

Latest Marathi News Live Update : लखनौमध्ये दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

"चुकीच्या माणसांमुळे आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली," सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली खंत ; म्हणाली…

SCROLL FOR NEXT