पुणे

रांजणगाव गणपतीचे मंदिर ३१ जुलैपर्यंत बंद राहणार

CD

शिरूर, ता. १४ : अष्टविनायक आराखड्याअंतर्गत मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामांना गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) महागणपती मंदिरात सुरू असलेल्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर बुधवार (ता. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिराच्या मुख्य रचनेसोबतच परिसरातील जतन, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे विभाग यांनी त्यास मान्यता देत आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी ‘श्री’ची नित्य पूजाअर्चा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र, या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या कामांचे महत्त्व ओळखून देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभाग व रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सरपंच सुवर्णा वायदंडे, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

IND vs AFG: सिराज आणि केएल राहुल भिडणार इतक्यात... मानव सुतारच्या पहिल्या विकेटवेळी मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात निष्पाप स्वभावाचे; सहज कुणाच्याही बोलण्यात फसतात अन् मोठ्या संकटात अडकतात

Latest Marathi News Live Update : चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात मुखईत जलआक्रोश; शेतकऱ्यांचा महामार्ग रोखून इशारा

SCROLL FOR NEXT