पुणे

जऊळके खुर्द शाळेला त्रेसष्ठ हजारांची देणगी

CD

पाईट, ता. १४ ः विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रूजावीत, विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जऊळके खुर्द जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षक पालकांनी रोख स्वरूपात सुमारे ६३,००० रुपयांची देणगी शाळेला दिली.

कार्यक्रमात शेतकरी नृत्य, कोळी गीत, आदिवासी नृत्य, बतावणी, अफजलखान वध, शॅडो डान्स, लावणी असा कलाविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जऊळके खुर्द गावच्या सरपंच संगीता बोऱ्हाडे, शालेय समिती अध्यक्ष प्रकाश राळे, उपाध्यक्ष सुजाता बोऱ्हाडे, टाकळकरवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रेय गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण बोऱ्हाडे, बाबूराव बोऱ्हाडे, माजी सरपंच योगेश बोऱ्हाडे, बाळासाहेब राळे, सुनील राळे आदी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक गणेश बैरागी, संतोष हांडे, सतीश यानभुरे व सिद्धार्थ ठोकळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT