पुणे

अनावळेतील युवकाने पेस युनिव्हर्सिटीतून मिळवली उच्चपदवी

CD

पाईट, ता २४ : अनावळे येथील अलोक सुभाष वाळुंज या तरुणाने अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील पेस युनिव्हर्सिटीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मास्टर इन सायन्स ही उच्चपदवी मिळवली आहे. नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पदवीदान दीक्षांत समारंभामध्ये अलोकला ही पदवी प्रदान करण्यात आली.
अलोक खेड तालुक्यातील अनावळे या छोट्या गावचा. आई गृहिणी असून त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. तर वडील पदवीधर असून पुणे येथे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करीत आहेत. आई सुषमा यांनी १० वर्ष आणि तर वडील सुभाष वाळुंज यांनी ५ वर्षे अनावळे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केले आहे.
अलोकने २०२२ मध्ये एमआयटी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर २०२३ मध्ये त्याने उच्च शिक्षण इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील पेस युनिव्हर्सिटीत पूर्ण केली. या दोन वर्षाच्या कालावधीत अलोकने पार्ट टाइम काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षाच्या कालावधीत अलोकला अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांनी खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केले असल्याचे त्याने सकाळशी बोलताना सांगितले.
नुकत्याच झालेल्या पदवीदान दीक्षांत समारंभामध्ये पेस युनिव्हर्सिटी (अमेरिका) कडून माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) याक्षेत्रात मास्टर डिग्री प्रदान केली. अलोकला मिळालेल्या यशाबद्दल त्याच्यावर अनावळे ग्रामस्थांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT