पुणे

कुंडेश्वर विद्यालयात १९९० च्या विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा

CD

पाईट, ता. १४ ः पाईट येथील कुंडेश्वर विद्यालयात १९८९-९० मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मारुती भिरूड, बाळकृष्ण बोरकर, सुरेश क्षीरसागर, बाळकृष्ण बोरकर, बाळासाहेब आंधळे, विष्णू दौंडकर या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, गुरुजनांच्या हस्ते विद्यार्थ्यांनाही गुलाबपुष्प देण्यात आले.
यानंतर, दिगंबर रौंधळ, शिवाकाली खेंगले, गंगुबाई वर्पे, बाजीराव डांगले, काळूराम डांगले, लहू नाईकडे, सुनील साबळे, जितेंद्र गोपाळे, सतीश गोपाळे, राजेंद्र आंद्रे, शंकर खेंगले, सुभाष आहेरकर, चिंतामण शिवेकर, बबन खेंगले, काळूराम तांबे या सर्वांनी शाळेतील मजेशीर किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजनांनीही विद्यार्थ्यांचे मजेशीर किस्से, गमतीजमती सांगितल्या. या बॅचच्या वतीने विद्यालयास एक लॅपटॉप व प्रिंटर भेट देणार असल्याची माहिती दिगंबर रौंधळ यांनी दिली.
मासवडीच्या जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर कुंडेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंतामण शिवेकर यांनी केले. तर, शिवाकाली खेंगले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS 100th Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना, नेहरुंच्या कृपेने वाचली; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

IND vs WI 1st Test Live: दोघंही वेडे! साई सुदर्शन-लोकेश राहुल एकाच दिशेला पळाले; विंडीजचे खेळाडूही गोंधळले, बघा पुढे काय घडले Video Viral

Manoj Jarange: दसरा मेळाव्याआधी राधाकृष्ण विखे पाटलांनी फोन का केला? संपूर्ण किस्सा सांगत मनोज जरांगेंनी समाजावर नवे काम सोपवले

IND vs WI, 1st Test: भारताचं टेन्शन वाढलं! फिफ्टीच्या जवळ असताना KL Rahul ने मैदानात का बोलावलं डॉक्टरांना?

Shubman Gill: दिसतो तसा नाही! अभिषेक शर्माने केली मित्राची पोलखोल; म्हणाला, 'त्याच्यामुळे आम्ही निलंबित झालो होतो...'

SCROLL FOR NEXT