पुणे

पाईट- आंबोली रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

CD

पाईट, ता. २६ ः पाईट- आंबोली (ता. खेड) रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पश्चिम भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजीळा सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थ, वाहतूकदार, प्रवासी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या नादुरुस्तीबाबत ‘सकाळ’ने वारंवार दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केले होते.
पाईट- आंबोली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावरून प्रवासासाठी केवळ काही मिनिटे लागत होती. मात्र, या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासासाठी तासनतास लागून हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटी बसेस, खासगी मोटारींचे टायर फुटल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. याबाबत खेडच्या आगारप्रमुखांनी सांगितले की, गेल्या दोन तीन महिन्यात या रस्त्यांवर एसटी बसेसचे सुमारे २२ टायर फुटले आहेत.

पाईट- आंबोली रस्त्यावरील कोये- पाईटपासून शेवटच्या वांद्रा गावापर्यंतच्या रस्त्यावरील पडलेले सर्व खड्डे टप्याटप्याने काळी खडी व डांबर टाकून भरण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित गावच्या ग्रामस्थांनी व प्रवासी यांनी सहकार्य करावे.
- अजिंक्य शिंदे, उपविभागीय अभियंता

02696

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT