पुणे

राजेवाडी ग्रामस्थांचे आजचा रास्ता रोको स्थगित

CD

फुलवडे, ता. २२ ः राजेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील राजेवाडी फाटा या ठिकाणी रविवार (ता.२३) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती राजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी साबळे यांनी दिली.
पोखरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा विद्युत पुरवठा खंडित केल्याने बंद होता. तो सुरू करण्यात आला. परंतु, तो सुरू राहिलच याची शाश्वती नसल्याने पहिले रास्ता रोको आंदोलन शुक्रवारी (ता. ७) रोजी करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी गुरुवारी (ता.२०) रोजी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची व संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, बैठक न झाल्याने राजेवाडी, गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, पोखरी, चिखली कोलतावडे या ग्रामपंचायतींनी पुन्हा रविवारी (ता. २३) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, असे साबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT