पुणे

बोरघरमध्ये आदिवासी मुलांना खेळणी वाटप

CD

फुलवडे, ता. २७ : बोरघर (ता. आंबेगाव) येथील आनंद कपूर प्रशिक्षण केंद्रात शाश्वत संस्था मंचर यांच्यामार्फत आंबेगाव, खेड तालुक्यातील आदिवासी भागात चालविल्या जाणाऱ्या १० बालवाडीतील १०४ मुलांना पुण्यातील महिंद्रा आणि महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या वतीने विविध प्रकारच्या खेळण्यांचे वाटप केल्याची माहिती शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे यांनी दिली.
या खेळण्यांमध्ये मण्यांच्या पाट्या, चेंडू, विविध कोडी, लिंगोरी, विविध आकार, इंग्रजीतील शब्द आदींचा समावेश होता. खेळणी मिळाल्याने बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या आनंदात बालवाडीतील मुलांनी विविध प्रकारची नृत्य व गाणी सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. याप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्रा स्कूलच्या शिक्षिका माया गुरंग, लॉरेन्स लींब, अर्जुन नायर, आयुष देवलाखी, लक्ष तिवारी, अंश तिवारी, आदित्य सूद, आयुष बगडे, दर्श अगरवाल, आर्यन,किल्ला, सुनील भोर आदी विद्यार्थी, शाश्वत संस्थेच्या बालवाडीतील शिक्षिका अलका लेंभे, सोनाली असवले, नूरजहाँ पठाण, राणी डगळे उपस्थित होत्या.
महिंद्र आणि महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे एकत्र गोळा करून ३० हजार रुपयांची खेळणी खरेदी करून बालवाडीतील मुलांना खेळणी त्याबरोबरच गोद्रे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक शाळेला ३० लेझीम, झांजरेवस्तीतील युवकांसाठी क्रिकेट संच, उतळेवाडीतील युवकांसाठी हॉलीबॉल संच दिला.
शाश्वत संस्थेच्या विश्वस्त सुलोचना गवारी यांनी प्रास्ताविक; तर, शांताराम गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पारधी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

SCROLL FOR NEXT