पुणे

कातकरी समाजाची शासनदफ्तरी झाली नोंद

CD

फुलवडे / घोडेगाव, ता. ७ : पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाचे काम १९७२ मध्ये सुरू होऊन २०००ला पूर्ण झाले. मात्र, या धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांची परवड झाली. यामधील आदिवासी कातकरी समाजाला तर गाव आणि ग्रामपंचायतच मिळालीच नव्हती. आजपर्यंत या कातकरी व्यक्तींच्या जन्म अथवा मृत्यूच्या नोंदी झालेल्या नाहीत. अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मूलभूत सुविधांपासून आजतागायत हा समाज वंचित राहिला. अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत बोरघर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल आठ वर्षांनी या आदिवासी कातकरी जमातीच्या व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत मिळाल्याने शासन दप्तरी झाली.
बोरघर (ता. आंबेगाव) येथील जुने आंबेगाव येथील कातकरी वस्तीवर नव्यानं तयार झालेल्या स्वतंत्र महसूल गावाची ग्रामसभा सोमवारी (ता. ६) बोरघरचे सरपंच विजय जंगले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. या ग्रामसभेत पाणी, वीज, घर, रोजगार या मूलभूत प्रश्नांच्या पूर्ततेसाठी चर्चा करण्यात आली. यावेळी या ग्रामसभेत कातकरी वस्तीच्या घरांच्या जागेच्या संदर्भात, तेथील मंजूर अंगणवाडी, दारू बंदी व पर्यायी रोजगारनिर्मिती, महत्त्वाचे दाखले काढून देणे व त्यासाठी येणाऱ्या अडचणींची पूर्तता करणे, घरगुती वीज व वाढीव वीजबिल यासाठी पर्यायी सौरयुनिट, पाण्याचा प्रश्‍न, सौर युनिटद्वारे पाण्याची व्यवस्था इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जुने आंबेगाव स्वतंत्र महसूल गावाची ग्रामकोष समितीमध्ये एक महिला प्रतिनिधी व एक पुरुष प्रतिनिधी यांची निवड करून समिती स्थापन करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित नागरिकांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोरघर गावचे सरपंच विजय जंगले, उपसरपंच राजेंद्र घोडे, सदस्य कल्पना किर्वे, ग्रामपंचायत अधिकारी संजय जोशी, नायब तहसीलदार शांताराम किर्वे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल, गृहपाल विपुल टकले, आदिम संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक समीर गारे, तलाठी प्रशांत बरे, पोलिस पाटील जमुना शेळके आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी ग्रामसभेस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT