फुलवडे, ता. १२ : वेताळवाडी (ता. आंबेगाव) येथील पाझर तलावाचे नुकतेच खोलीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सकाळ रिलीफ फंड व न्यूमन ईस्सार इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (भोसरी) तसेच कोळवाडी-कोटमदरा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. खोलीकरणामुळे तळ्याची पाणी साठवण क्षमता १९ लाख ६० हजार लिटर क्षमतेने वाढणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
वेताळवाडीत ५० कुटुंबे राहत असून येथील लोकसंख्या सुमारे २५० एवढी आहे. हा परिसर डोंगररांगांनी वेढलेला असून पावसाळ्यात येथे डोंगर उतारावरील पाणी पाझर तलावात साचविले जाते. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. परंतु उन्हाळ्यातील काही महिने तलावात पाणी शिल्लक राहत नसल्याने पाण्याची टंचाई निर्माण होते. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून तळ्यातील गाळ काढून ३५ मीटर लांबी, २८ मीटर रुंदी व २ मीटर खोलीचे काम केले. खोलीकरण झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणी पुरेल अशा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त करत ‘सकाळ’ तसेच ‘न्यूमन ईस्सार’यांचे आभार मानले.
सरपंच मुरलीधर असवले, ग्रामपंचायत सदस्य लहू असवले, गिरीश मते, धीरज मते, राहुल मते, कुणाल डगळे, समीर मते, ठेकेदार गणेश शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
03816
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.