पुणे

शांती अन्‌ नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत संगम : भीमाशंकर

CD

अविनाश घोलप : सकाळ वृत्तसेवा
भीमाशंकर,ता. २४ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर मंदिराची ओळख आहे. येथे आल्यावर श्रद्धा, शांती आणि नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत संगम येथे अनुभव मिळतो. श्रावण महिना हा एक विशेष आध्यात्मिक काळ मानला जातो. सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये वसलेले भीमाशंकर केवळ एक तीर्थक्षेत्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी उत्कृष्ट स्थान आहे. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा हंगाम संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. परिसरात धबधबे कोसळतात.

श्रद्धाळू भक्तांसाठी हे ठिकाण पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे स्थान आहे. मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पात प्राचीन नागर शैलीचे सौंदर्य दिसून येते. ध्यान आणि आध्यात्मिक शांती शोधणाऱ्या भाविकांसाठी हे एक विशेष स्थान आहे.


मंदिर परिसरातील पर्यटन स्थळे
१. गुप्त भीमाशंकर, हनुमान तलाव
२. नागफणी पॉइंट, बॉम्बे पॉइंट
३. भोरगिरी किल्ला, भीमाशंकर अभयारण्य,
४. निसर्गरम्य सह्याद्रीच्या लांबच लांब पर्वतरांगा


भाविकांच्या सुविधा
१. पहाटे ५ वाजता पूजा विधी संपन्न झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करणार
२. पार्किंग व्यवस्था - १ ते ४ अशी वाहने पार्किंग व्यवस्था
३. भाविकांसाठी मिनी बसची सुविधा उपलब्ध
४. सुरक्षितेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त


• भाविक, पर्यटकांची महत्त्वाचे
१. अभयारण्यातील वन्यजीवांपासून दूर रहा
२. पर्यटन स्थळांवर पायवाटा निसरड्या ठिकाणी काळजी घ्यावी
३. अभयारण्यात घनदाट जंगलात जाणे टाळावे
४. चोरट्यांपासून सावध रहा.
५. धबधब्यावर अतिउत्साह टाळावा


देवस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी एक नियमितची व दुसरी ऑनलाइन अशा दोन रांगा व मुखदर्शन अशी दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे.
- मधुकर गवांदे, सह. कार्यकारी विश्वस्त, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे उत्तर भारतीय श्रावण बंदोबस्तासाठी शनिवार ते सोमवार आठ पोलिस अधिकारी, ९० अंमलदार व मंगळवार ते शुक्रवार १ पोलिस अधिकारी, ७ अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली असून श्रावण बंदोबस्तासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार बंदोबस्त ठेवण्यात येईल.
- सागर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, घोडेगाव ता. आंबेगाव.

मदतीसाठी संपर्क
घोडेगाव पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक : ०२१३३-२४४१३३.
रुग्णवाहिका क्रमांक : १०८

04203

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT