पुणे

डिंभे येथे पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत

CD

अविनाश घोलप : सकाळ वृत्तसेवा
फुलवडे, ता. १९ : डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची मुख्य इमारत व निवासस्थान मोडकळीस आले आहे. दवाखान्याला स्वतःची जागा उपलब्ध नाही. यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.


पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) डिंभे खुर्द येथे उपलब्ध असणारी विविध प्रकारची औषधे उदा. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण विटा आदींचा लाभ पशुपालकांनी घ्यावा. एफ-एम-डी, लंपी आदींचे लसीकरण वेळच्या वेळी करून घेणे आवश्यक आहे.

दवाखान्यांतर्गत येणारी गावे
डिंभे बुद्रुक
डिंभे खुर्द
गोहे बुद्रुक गोहे खुर्द
सुपेधर
म्हाळुंगेतर्फे घोडा
मापोली

दवाखान्यातील रिक्त पदे
अर्धवेळ परिचर १
परिचर - १


यांची आहे गरज
- दवाखान्यास स्वतःची जागा व इमारत
- स्वच्छतागृहाची गरज
- मनुष्य बळाची गरज

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या...........९९
वंध्यत्व निर्मूलन संख्या...........९०

लसीकरण
लंपी...........११३६
लाळ्या खुरकूत...........९५९


परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
स्तनदाह
प्रोटोझोअल डिसीजेस
चयापचय आजार

वैरण बियाणे वितरण
मका, ज्वारी..........९९ किलो


सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, जनावरांचे लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे. दवाखान्यात उपलब्ध असलेल्या उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा वापरूनच माजावर आलेल्या पशूंचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. जेणेकरून संकरित गाईपासून पैदास होणाऱ्या कालवडी जास्त दूध देतील.
- डॉ सुरेश कड, पशुधन विकास अधिकारी, डिंभे खुर्द (ता. आंबेगाव).

पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर वेळेवर भेट देतात. जनावरांची तपासणी करून योग्य औषधोपचार करतात. तसेच पशुपालकांना चांगले मार्गदर्शन करतात.
- खंडू कोकणे, पशुपालक, म्हाळुंगे तर्फे घोडा (ता. आंबेगाव).

वेळेवर सरकारी डॉक्टर उपलब्ध झाले नाही तर कधी कधी खासगी डॉक्टरांकडून जनावरांचे उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे नाहक आर्थिक खर्चाचा भार वाढतो.
- विनोद राक्षे, पशुपालक, डिंभे खुर्द (ता. आंबेगाव).

04639

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

Navi Mumbai: 'त्या' गोष्टीमुळे नैराश्य, तरूणीची खाडीत उडी, धक्कादायक कारण समोर; Video Viral

काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

Latest Marathi News Live Update : उष्णतेमुळे वकिलांना दिलासा; १ मार्च ते ३० जून काळा कोट घालणे बंधनकारक नाही

एका चुकीमुळे सुंदरा फेम अभिनेत्रीने गमावलेले सगळे प्रोजेक्ट्स ; "मी दिवसभर अनेक स्टुडिओ पालथे घातले"

SCROLL FOR NEXT