फुलवडे, ता. २५ ः डिंभे धरणापासून (ता. आंबेगाव) पुढे आहुपेकडे जाणाऱ्या सुमारे ३३ किलोमीटर अरुंद वळणावळणाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसामुळे झाडेझुडपे, वेली वाढलेली आहेत. त्यामुळे वळणांवर पुढील येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने छोटे- मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही झाडेझुडपे, वेली काढून टाकावीत, अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
डिंभे धरणापासून पुढे अडिवरे, माळीण फाट्यापर्यंतचा १८ किलोमीटरचा रस्ता हा पाणलोट क्षेत्रालगत असून, दुसऱ्या बाजूने डोंगररांग आहे. तसेच, वळणावळणांचा व अरुंद रस्ता असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना अडचणी येत आहेत. मोठी दुर्घटना घडू नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडेझुडपे, वेली काढून टाकणे आवश्यक आहे.
04652
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.