फुलवडे ता. २६ : अडिवरे (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय (श्रेणी २) दवाखान्याची इमारत बऱ्यापैकी असून पावसाळ्यात छत गळते. या दवाखान्याअंतर्गत तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात शेळ्यांचे कृत्रिम रेतन केले जात असल्याचे पशुधन पर्यवेक्षक म्हणून डॉ. संदीप दगडे यांनी सांगितले.
डॉक्टरांना कधीही फोन केला तर डॉक्टर येतात व जनावरांवर योग्य तो औषधोपचार करतात. आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करतात असे या भागातील पशुपालकांचे म्हणणे आहे. डॉ. दगडे यांना परिचर म्हणून चिराग गुळवे मदत करत आहेत.
दवाखान्याचे कार्यक्षेत्र
अडिवरे
पंचाळे बुद्रुक व खुर्द
आमडे
वचपे
मेनुंबरवाडी
कोंढरे, असाणे
माळीण
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........५६
वंध्यत्व निर्मूलन संख्या..........०८
लसीकरण
लाळ्या खुरकूत..........९००
लंपी..........९००
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी) .......... ७५६
रेबीज.......... १२
परिसरात आढळणारे पशुरोग
लंपी
थायलेरिया
वैरण बियाणे वितरण
१०० पशुपालकांना मका, ज्वारी - ५०० किलो
चारा उत्पादन क्षेत्र ३५ हेक्टर
सिंचित ओलिताखाली क्षेत्र ७६ हेक्टर
वार्षिक चारा (टनांत)
हिरवा........१०५
वाळलेला........८७ टन
अडिवरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा उत्तम प्रकारे मिळत असून डॉ. दगडे हे तत्पर सेवा देतात, सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टरांना फोन केला तरी डॉक्टर वेळेत उपलब्ध होतात.
- विजय चिमाजी मडके,
विश्वेश्वर दूध उत्पादक मंडळ, माळीण फाटा ता. आंबेगाव.
पशुपालकांनी दुग्ध व्यवसाय वाढीकरिता जातिवंत जनावरे खरेदी करावीत तसेच कृत्रिम रेतनाचा अवलंब करावा, गाय, म्हैस या बरोबरच शेळ्यांच्या सुधारित जातीचे कृत्रिम रेतनाची सुविधा अडिवरे दवाखान्यामार्फत पुरविली जाते. याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा.
- डॉ. संदीप दगडे, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना, अडिवरे ता. आंबेगाव
04656
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.