भीमाशंकर, ता. २५ : तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील शासकीय आश्रमशाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मंगळवार (ता. १८) व बुधवारी (ता. १९) झाल्या. यात अनुदानित आश्रमशाळा कामशेत, शासकीय आश्रमशाळा तेरुंगण, राजपूर, टोकावडे या आश्रमशाळांमधील स्पर्धकांनी बाजी मारली.
स्पर्धेत शासकीय आश्रमशाळा तेरुंगण, राजपूर, टोकावडे, कोहिंडे, चिखलगाव (खेड), अनुदानित फुलवडे, कामशेत (मावळ) या आश्रमशाळांमधील ३५३ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, रिले, वैयक्तिक धावणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक आदी स्पर्धांचा समावेश होता. सचिन डुंबरे, मोहन वाघमारे, अविनाश बिरादार यांनी पंच म्हणून तर अंबादास जाधव, संतोष हिटनळी, अशोक उदगिरे, शुभांगी शेळके, अर्चना कांबळे, विजय कसावी, भीमा माळी यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. स्पर्धेदरम्यान डॉ. गायकवाड व विद्या कोळप यांनी जखमी खेळाडूंवर उपचार केले. यावेळी केंद्र समन्वयक तथा मुख्याध्यापक अभिमन्यू भुजबळ, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार, मुख्याध्यापक गणेश गावडे आदी उपस्थित होते. अधीक्षक माधव मोतेवाड, रोशनी पवार यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.