पुणे

इंदिरानगर येथील वस्तीवर प्रौढ साक्षरता वर्ग सुरू

CD

फुलवडे, ता. २ : ‘‘शिनोली (ता. आंबेगाव) येथील इंदिरानगर येथे आदिवासी कातकरी वस्तीवर आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, आंबेगाव व रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्या सहकार्याने प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले,’’ अशी माहिती आदिम संस्थेचे समीर गारे यांनी दिली.
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रौढांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी येथील नागरिकांच्या मागणीनुसार प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केला आहे. सध्या या वर्गात २० प्रौढ महिला दाखल झाल्या असून, त्यांना अक्षर ओळख, मूलभूत अंकज्ञान आणि व्यवहारज्ञान शिकवले जाणार आहे. यासोबतच विविध कायद्यांविषयी, योजनांविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. हा वर्ग दररोज संध्याकाळी चालणार आहे.
यावेळी आदिम संस्थेच्या प्रा. स्नेहल साबळे म्हणाल्या की, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिक्षणाला वयाचे बंधन नसते. आपण घेतलेला हा निर्णय आपल्या पुढील पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे.
वस्तीतील अनेकांसाठी ज्ञानाचे एक नवीन दालन उघडणार असून, या आदिवासी कातकरी समुदायाच्या विकासाला गती देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. स्वयंसेविका अर्चना चौरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपवर कमळाविरोधात प्रचाराची वेळ, अधिकृत उमेदवार अपक्ष लढणार; एकाच जागी दोन एबी फॉर्म दिल्यानं नामुष्की

Stock Market Today : अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा फटका! शेअर बाजार ‘लाल’, सोनं तेजीत; Reliance Industries ने गाठला नवा उच्चांक

Taj Mahal Free Entry: जगातील सातवं आश्चर्य 'या' ३ दिवसात फ्रीमध्ये पाहता येणार, का मिळतोय ताजमहालमध्ये मोफत प्रवेश?

Ruturaj Gaikwad कर्णधार, संजू सॅमसनची एन्ट्री! न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत संधी न मिळालेल्या खेळाडूंची Playing XI

Railway Mega Block : रेल्वे प्रवाशांचे ‘मेगा’ हाल; दौंड-काष्टीदरम्यान २० दिवसांचा ब्लॉक

SCROLL FOR NEXT