पुणे

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मंगळवारी चर्चासत्र

CD

फुलवडे, ता. २ : पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता. ६) सकाळी ११ ते २ या वेळेत प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वन विभाग घोडेगाव व भीमाशंकर अभयारण्य- १ येथील अधिकारी यांच्या उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचे वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती आदिवासी समाज कृती समितीचे संस्थापक-संचालक सीताराम जोशी यांनी दिली.
राष्ट्रपती यांनी आंबेगाव तालुक्यातील ६४ गावे अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. ही गावे ३६ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात येतात. यापैकी फलोदे, न्हावेड, आघाणे, तिरपाड, पोखरी, चिखली, राजपूर, जांभोरी, आमडे, असाणे, राजेवाडी व फुलवडे या गावांचे सामूहिक वनहक्क दावे मंजूर झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित ५२ गावांचे दावे मंजूर झालेले नाहीत. ही सर्व आदिवासी गावे असून जल, जंगल व जमिनींवर अवलंबून आहेत. या गावांमधील सामूहिक वनहक्क दावे मंजूर होण्यासाठी पंचायत समिती, प्रकल्प कार्यालय यांच्या समन्वयाने व वन विभागाला सोबत घेऊन चर्चासत्र आयोजित करावे अशी मागणी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा तालुका कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष प्रदीप देसाई यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.प्रदिप चव्हाण (पुणे), युवराज लांडे (नाशिक) व वामन बाजारे (राजगुरुनगर) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.


या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, वनविभाग यांच्यात समन्वय साधून गावपातळीवरील लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा यांची भूमिका व जबाबदारी कायद्यातील तरतुदीद्वारे त्यांना समजावी यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
- सीताराम जोशी, पेसा अभ्यासक, गोहे (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

High Court: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्णय

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

मोठी बातमी : T20 World Cup 2028 साठी १२ संघ निश्चित झाले! भारतात खेळण्यास नकार देणारा बांगलादेशही खेळणार, डायरेक्ट एन्ट्री

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT