पुणे

भीमाशंकर मंदिर अखेर तीन महिन्यांसाठी बंद

CD

भीमाशंकर, ता. ९ : नूतनीकरण व विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या कामांमुळे शुक्रवार (ता. ९) पासून पुढील तीन महिने श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. मंदिर विकासासाठी हा तात्पुरता त्रास भाविकांनी सहन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मंदिर परिसरातील सभा मंडपाचे बांधकाम तसेच विविध विकासकामे सुरू करण्यात आल्याने भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बंद कालावधीत मुख्य गर्भगृहात प्रवेश बंद राहणार असून, भीमाशंकरकडे जाणारे सर्व मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिराचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी अधिक सुविधा, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उभारण्यासाठी हे काम अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य व कामगारांची वर्दळ असणार असल्याने अपघात टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने मंदिर बंद हे पाऊल उचलले आहे. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक सोयीसुविधा आणि भव्य दर्शनाचा अनुभव मिळणार आहे. घोडेगावचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. भाविकांनी या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4811

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

SCROLL FOR NEXT