पुणे

फुलवडे येथे गाव आरोग्य मूल्यांकन

CD

फुलवडे, ता. १८ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. १७) आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे जन आरोग्य समितीच्या वतीने गाव आरोग्य मूल्यांकन प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली.
या दरम्यान, समिती सदस्यांनी गावातील मोहरेवाडी, हिलेवाडी आणि नंदकरवाडी येथील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच शाळा, उपकेंद्र, पाण्याचे स्रोत याही ठिकाणांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेण्यात आला. सध्या अंगणवाडीची सर्व कामे ऑनलाइन प्रणालीवर आधारित आहेत. मात्र, दुर्गम भागात इंटरनेटची रेंज नसल्यामुळे रिपोर्टिंगमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यावर होत असून, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर सरपंच यांनी तातडीने दखल घेत आगामी ग्रामसभेत हा विषय मांडण्याचे आणि बीएसएनएल मनोऱ्याच्या सेवेसंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच अंगणवाड्यांमध्ये अद्याप विजेची सोय नाही. उघडेवाडी येथे हक्काची इमारत नाही. यावर उपाय म्हणून जन आरोग्य समितीने ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांच्या सीएसआरच्या माध्यमातून या ठिकाणी कायमस्वरूपी सोलर पॅनेल व नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी कर्वे संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामस्थांनी गावाचा सामाजिक नकाशा तयार केला. या नकाशाच्या माध्यमातून गावातील भौगोलिक स्थिती, वस्त्या आणि तेथील आरोग्याच्या समस्यांचे दृष्य स्वरूप मांडण्यात आले. ज्यामुळे भविष्यातील आरोग्य आराखडा तयार करणे सोपे होणार आहे.
यावेळी सरपंच बबन मोहरे, उपसरपंच तेजस्विनी भारमळ, तनुजा मोहरे, जन आरोग्य समितीचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आदिम संस्थेचे प्रतिनिधी समीर गारे, रोहिदास फलके, कर्वे समाजसेवा संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

04838

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT