पुणे

फुलवडेत ‘गोल्डन बेरी’ची यशस्वी लागवड

CD

फुलवडे, ता. १३ : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील युवा शेतकरी गौरव बबन गभाले यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीसोबतच प्रायोगिक तत्त्वावर ''गोल्डन बेरी''ची यशस्वी लागवड केली आहे. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले असून, दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हे एक फायदेशीर नगदी पीक ठरत आहे.
गभाले यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून पाच गुंठे क्षेत्रात बेड पद्धत आणि मल्चिंग पेपरचा वापर करून ५०० रोपांची लागवड केली. स्ट्रॉबेरी आणि गोल्डन बेरी या दोन्ही पिकांसाठी त्यांना सुमारे ४५ हजार रुपये खर्च आला. गोल्डन बेरी हे पिवळसर-नारंगी रंगाचे, आंबट-गोड चवीचे फळ असून ते पातळ कागदी कवचात सुरक्षित असते. या फळात जीवनसत्त्व ‘क’, ‘अ’, फायबर आणि ॲन्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी, कर्करोगाशी लढण्यास मदत करण्यासाठी फायदेशीर असून अन्नाचा एक अतिशय महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखली जाते. तसेच मधुमेह रोखण्याचा एक चांगला मार्ग आहे.

गोल्डन बेरीची वैशिष्ट्ये
सहा महिने सलग उत्पादन मिळते.
नगदी पीक म्हणून मोठी मागणी आहे.
पोषक घटक भरपूर आहेत.
कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळते.
दुर्गम भागासाठी उपयुक्त पीक आहे.

रोजच्या आहारात गोल्डन बेरीचा वापर
गोल्डन बेरी नैसर्गिकरीत्या गोड आणि आंबट असल्याने, त्यांचा वापर केक, मिठाई, बेक्ड पदार्थ, सॅलड आणि फळांच्या सॅलडमध्ये केला जातो. निरोगी नाश्ता म्हणून, बेरी ताजे किंवा स्वतः वाळवून देखील खाऊ शकता.

गोल्डन बेरीचे आरोग्य विषयक फायदे
मानवी आरोग्यासाठी चांगले असलेले पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्स गोल्डन बेरीमध्ये आढळतात.
गोल्डन बेरी एक सुपरफूड आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी, वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी,
वजन कमी करण्यासाठी, कर्करोगाशी लढण्यास मदत करण्यासाठी फायदेशीर असून अन्नाचा एक अतिशय महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखली जाते. तसेच मधुमेह रोखण्याचा एक चांगला मार्ग आहे.

फळ झाडावर असताना कागदासारखे कवच असते. कवच काढल्यानंतर आत पोपटी नारंगी रंगाचे आकर्षक फळ दिसते. या फळांचा वापर स्मूदीज, सॅलड, जॅम तसेच मिठाईत केला जातो. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीला मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
- अरविंद मोहरे, सहायक कृषी अधिकारी, आंबेगाव

4907

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवस आधी ट्विट करणारा समित ठक्कर कोण? रोहित पवारांचा गंभीर आरोप

जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे अपहरण; सात तास अमानुष छळ, थरारक घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ!

Rohit Pawar PC : अजितदादांना अमेरिकेचं जुनाट विमान का दिलं? ८५ तास उरलेले, VSR ला DGCA वाचवतंय; रोहित पवारांचा आरोप

TET Promotion Rules : टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्‍नतीवरून वादंग; शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव, पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात!

'रात्रीच्या वेळी मला एकटीला भेटायला बोलावलं आणि...' अभिनेत्रीला सहकलाकाराने केलेली अश्लील मागणी, म्हणाली...

SCROLL FOR NEXT