फुलवडे, ता. २३ ः शिनोली (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वीणा सदगीर यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण बोराडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा जयजयकार करत, शिवरायांचे शौर्य, पराक्रम यांची गाथा गाणाऱ्या, त्यांच्या जीवनाचा परिचय देणाऱ्या कथा भाषणातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
तसेच, याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी छत्रपती, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई, तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा वेषभूषेतून साकारल्या होत्या.
यावेळी दुसरीच्या विद्यार्थिनींनी शिवरायांवर आधारित नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक हलगीच्या तालावर विविध कलाकृती साकारत लेझीम नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका शैला रांजणे, सुलोचना बेंढारी, चंद्रकला शिंगाडे, अनिता लांडे, नीलेश क्षीरसागर यांनी केले.
04954, 04955
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.