फुलवडे ता. २२ ः शिनोली (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थिनी ऋतुजा रोहिदास भालेराव हिची महाराष्ट्र शासन ‘कृषी उपसंचालक’ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच, ‘रूम टू रीड’ उपक्रमातर्गत वाचनालयाचे उद्घाटन ऋतुजाच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वीणा सदगीर यांनी दिली.
यावेळी ऋतुजाचा लेझीमच्या तालावर व फुलांच्या वर्षावात स्वागत करत तिचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह, शाल, फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ऋतुजाने विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करून ध्येयापर्यंत जाण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र बोऱ्हाडे, श्याम बोऱ्हाडे, मधुकर बोऱ्हाडे, सुरेश बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, पांडुरंग हिंगणे, ॲड. प्रकाश शहाणे, सिद्धांत मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण बोऱ्हाडे, उपाध्यक्षा सुनंदा करवंदे, सदस्या शीतल बोऱ्हाडे, प्रियांका डुंबरे, मनिषा साबळे, किरण ढेरंगे, ओंकार भालेराव, विजय बोऱ्हाडे, नवनाथ हिंगणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुलोचना बेंढारी, नीलेश क्षीरसागर, अनिता लांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शैला रांजणे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकला शिंगाडे यांनी आभार मानले.
04957
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.