पुणे

आंबेगावच्या आदिवासी भागातील सहा शाळांना इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड

CD

फुलवडे, ता. २७ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथील श्री. नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित आश्रमशाळेत योजक संस्था पुणे यांनी टाटा मोटर्स यांच्या आर्थिक सहकार्यातून ६५ इंची इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट दिला आहे.
आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे योजक संस्था पुणेच्या अध्यक्षा रेणू इनामदार यांनी सांगितले.
इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड हे शिक्षणाला अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनवणारे एक उत्तम डिजिटल साधन आहे. हे फळ्यावर लिहिण्यासोबतच संगणक स्क्रीनसारखे कार्य करते, ज्यामुळे शिकवणे आणि शिकणे अधिक रंजक आणि परस्परसंवादी होण्यास मदत होते. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील ५ शाळांना ६५ इंची इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट दिला आहे. त्यामध्ये श्रीरंग विष्णू गभाले मराठी विद्यालय फुलवडे, न्यू इंग्लिश स्कूल बोरघर, सहकार महर्षी गोविंदराव वळसे पाटील विद्यालय असाणे, वनेश्वर विद्यालय तिरपाड, कृष्णा यशवंत भालचिम विद्यालय माळीण या शाळांचा समावेश आहे. या इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डमध्ये पाचवी ते दहावीतील सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे.
टाटा मोटर्स पुणे व योजक संस्थेच्या वतीने या सहा शाळांतील आठवी ते दहावीच्या वर्गांत इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचे आठवड्यातून एक दिवस क्लास घेतले जात असून त्यासाठी प्रवीण पारधी, स्मिता राऊत, मनीषा लाडके या अध्यापकांची नेमणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

SCROLL FOR NEXT