फुलवडे, ता. ५ : “आंबेगाव तालुक्यातील १२ गावांचे वनहक्क दावे मंजूर केले आहेत. प्रशिक्षण देऊन सर्व ग्रामपंचायतींचे आराखडे तयार केले आहेत. त्यामुळे देवराई जतन करण्यासाठी आदिवासी विभाग पुढाकार घेत आहे.” असे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले.
डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथील ज्ञानदा प्रशिक्षण केंद्रात ‘नदी की पाठशाळा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत देसाई बोलत होते. तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन अप्पर भीमा क्लेक्टिव्ह, नदी की पाठशाळा फाउंडेशन, फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी व शाश्वत संस्था, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी वनहक्क कायदा अभ्यासक डॉ. विजय एदलाबादकर, डॉ. अजित गोखले, डॉ. वडगबाळकर, पंचायत समिती सदस्या ज्योती पारधी, शैलजा देशपांडे, सुमंत पांडे, नमिता शर्मा, बुधाजी डामसे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘नद्या बारमाही वाहत रहाव्यात, नद्यांचे पाणी स्वच्छ रहावे याकरिता पर्यावरणातील बदल अभ्यासून, उपजीविका सुरक्षित करणे हेतूने पेसा व वनहक्क कायदा यांचा प्रभावीपणे अंमल करून, स्थानिक संस्थाधने सुरक्षित ठेऊन रोजगार उपलब्ध व्हावा.’ असे डॉ. विजय एदलाबादकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. या कार्यशाळेत सरपंच बबन मोहरे, विजय जंगले, संगीता किर्वे, सोमा दाते, भीमाबाई धादवड, रामचंद्र तारडे तसेच फुलवडे, बोरघर, माळीण, पंचाळे, कुशीरे, असाणे, तिरपाड आदी गावांमधील सरपंच, सदस्य, पेसा, वनहक्क, जैवविविधता कमिटी सदस्य, विविध क्षेत्रातील अभ्यासक व ग्रामस्थ अशा एकूण ९६ जणांनी सहभाग नोंदवला.
तारा शिंदे, बुधाजी डामसे यांनी सूत्रसंचालन तर गणपत ढेरंगे यांनी आभार मानले.
04985
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.