फुलवडे, ता. ६ : फुलवडे-आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. या भागाची लोकसंख्या २ हजार ४५९ एवढी आहे. येथील गावांना तसेच त्यांच्या अंतर्गत वाड्यावस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत, मात्र तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम होणे बाकी आहे. हे रस्ते झाल्यास नागरिकांना दळणावळणाच्या दृष्टीने अधिक सोईस्कर होणार आहे.
आरोग्य सुविधांची उपलब्धता नाही
वाड्या वस्त्यांवरील रुग्णांना पायपीट करत प्राथमिक उपचार उपकेंद्रात जावे लागते. आजाराचे स्वरूप गंभीर असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे, अडिवरे, तळेघर, तिरपाड, तळेघर व घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय गाठावे लागते.
टँकरद्वारे पाणी
पाण्यासाठी उन्हाळ्यात मात्र छोटे मोठे बंधारे, बोअरवेल, विहिरी, तळी, कूपनलिका यासारखे पाण्याचे स्रोत आटल्याने या भागात पाणी टंचाई निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून काही वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
खासगी वाहनांचा पर्याय
या भागात एसटी च्या ५ फेऱ्या सुरू आहेत. अत्यावश्यक वेळी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. गर्भवती स्त्रियांसाठी व रुग्णांसाठी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका उपलब्ध होतात.
या भागात वीजसेवा अनिश्चित असते. एकदा गेली की लवकर येत नाही.
आपटी (ता. आंबेगाव) येथून खेतेपठार (ता. जुन्नर) येथे जाण्यासाठी पायवाट आहे. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत मंजूर असून निधी नसल्याने काम अपूर्ण आहे. तालुक्यातील शासनाचे सर्व विभागामध्ये समन्वय साधून, त्या त्या सर्व विभागाच्या निधीतून विकास करण्याची जबाबदारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथील प्रकल्प अधिकाऱ्यांची आहे.
- सीताराम जोशी, संस्थापक, आदिवासी समाज कृती समिती, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.