फुलवडे, ता. २० : राज्यातील ४९७ शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील अधीक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, या अन्यायाविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटनेने दिला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्तांना निवेदने दिली आहेत.
संघटनेचे राज्याध्यक्ष राजू सरदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. आश्रमशाळांमध्ये अधीक्षक हा एकमेव संवर्ग २४ तास कार्यरत असतो. कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्याने अधीक्षकांना मानसिक ताण आणि आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ठाणे विभागीय अध्यक्ष माधव मोतेवाड यांनी सांगितले. अनेक ठिकाणी साप्ताहिक सुट्टीही नाकारली जात असून, ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी एकाच अधीक्षकावर सोपवली जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
प्रमुख मागण्या
अधीक्षकांच्या कामाचे तास निश्चित करावेत.
अधीक्षक पदाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा.
कामासाठी शिफ्ट पद्धत लागू करावी.
रिक्त पदांची भरती करून सहाय्यक अधीक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.