फुलवडे, ता. १६ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील वनांमध्ये घोडेगाव वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत सुमारे २१ पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली.
घोडेगाव वन परिक्षेत्र हद्दीत कोळवाडी-कोटमदरा, काळवाडी-दरेवाडी, ढाकाळे, गंगापूर, शिनोली, कानसे आदी २१ ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत.
राज्य प्राणी शेकरूसह, बिबट, कोल्हा, तरस, सांबर, हरीण, रानमांजर, खवले मांजर इत्यादी प्राणी या वॉटर होल वर पाणी पिण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या विशिष्ट वेळी नियमित येत आहेत.
जास्तीत जास्त वन्य पशुपक्ष्यांना फायदा व्हावा या दृष्टीने योग्य जागा निवडून पाणवठ्यांची निर्मिती केलेली आहे. या पाणवठ्यात दर १० दिवसाला शुद्ध पाणी भरले जाते. सदर पाणवठ्यांची साफसफाई, देखभाल वन मजूर, वनरक्षक व वनपाल वेळोवेळी करत आहेत.
जंगलातच पाण्याची व्यवस्था झाली असल्याने वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे लिमकर यांनी सांगितले.
05086
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.