फुलवडे ता. २१ : आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रांत ''पेसा'' कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी अभ्यासक सिताराम जोशी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. काही पोलिस ठाण्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
केंद्र सरकारने १९९६ मध्ये लागू केलेल्या या कायद्याचा मुख्य उद्देश स्थानिक परंपरा, संस्कृती आणि सामूहिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे हा आहे. राज्य सरकारने २०१४ मध्ये या कायद्याचे नियम मंजूर केले आहेत. नियम १९ नुसार, पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्याची नोंद केल्यानंतर त्याची माहिती ग्रामसभा किंवा शांतता समितीला देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील काही पोलिस ठाणी या नियमांचे पालन करत नसल्याचे जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. गावपातळीवरच तंटे सुटावेत आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.