पुणे

कायदा-सुव्यवस्थेची ‘गुढी’ उंच उभारू या !

CD

पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने केवळ अडचणींवर मात केली नाही, तर सक्षम आणि प्रभावी पोलिस यंत्रणा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेची ‘कायद्याची गुढी’ शहरासाठी समाधानकारक आणि आशादायी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय नव्याने अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. स्थापनेच्या काळात पोलिस अधिकारी व अंमलदारांची कमतरता असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान होते. मर्यादित मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण अधिक होता. विस्तीर्ण भौगोलिक हद्द, शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश तसेच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाची धार्मिक व तीर्थक्षेत्रे यामुळे कायदा-सुव्यवस्था राखणे अधिकच आव्हानात्मक होते. तरीही पोलिसांनी कर्तव्यदक्षतेने परिस्थिती हाताळली.
मागील काही वर्षांत मात्र परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत मनुष्यबळात सातत्याने वाढ होत गेली. पोलिस ठाण्यांची संख्या वाढविणे, आधुनिक साधनसामग्री व वाहनांची उपलब्धता वाढविणे तसेच नियोजनबद्ध कामकाजामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
या वाढलेल्या मनुष्यबळाचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येत आहे. कायदा - सुव्यवस्था कायम ठेवण्यासोबतच पीडितांना तत्काळ मदत पोहोचवण्याचा कालावधी कमी झाला आहे. तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे, गस्त वाढवणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत पोहोचणे या बाबींमध्ये पोलिस अधिक परिणामकारक ठरत आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेमुळे येत्या काळात अंमलदारांची संख्या आणखी वाढणार आहे. याशिवाय आयुक्तालयाला आवश्यक असलेल्या पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले असून हे प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहेत.

सध्याचे मनुष्यबळ
पोलिस आयुक्त - १
पोलिस सहआयुक्त - १
अपर पोलिस आयुक्त -२
पोलिस उपायुक्त - ८
सहायक पोलिस आयुक्त - १८
पोलिस निरीक्षक - ८४
सहाय्यक निरीक्षक - ११३
उपनिरीक्षक- २८५
अंमलदार - ५१६४
--------
आवश्यक पदे
- जलद प्रतिसाद पथक - ११२ पदे
- बँड पथक - ३५ पदे
- मोटार परिवहन विभाग चालक - ३३८ पदे
- मोटार परिवहन विभाग तांत्रिक - १७ पदे
- विधी अधिकारी पदे - ४
- शिरगाव, महाळुंगे, रावेत पोलिस ठाणे - २५३ पदे
- लिपिक - ३५ पदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT