पुणे

फुले यांच्या जीवनावर पिपंळवंडीत व्याख्यान कवाडे सर्वांसाठी खुली : रोकडे

CD

पिंपळवंडी, ता. १३ : महात्मा फुले यांची जयंती पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. गणेश रोकडे यांचे फुले यांच्या जीवनावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते.
रोकडे यांनी सांगितले, ‘‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्यामुळेच आज शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली झाली आहेत. आज जनतेने त्यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक विद्यार्थी पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आपण त्यांना शिक्षण कसे मिळेल, याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.’’ अध्यक्षीय भाषणात सतीश कसबे यांनी महात्मा फुले यांनी जुन्नर तालुक्यात ओतूर येथे सुरु केलेली मुलींची शाळा, त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
यावेळी सरपंच मेघा काकडे, माजी सरपंच विमल फुलसुंदर, सामाजिक कार्यकर्ते सतीश कसबे, बसपचे पुणे जिल्हा प्रभारी श्रीकांत कसबे, सदस्य सचिन ठाणेकर, तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला अध्यक्षा पूनम दुधवडे, वंचित पुणे जिल्हा पदाधिकारी अरविंद पंडित, एकता पंडित, गौतम करंदीकर, अर्जुन सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान काकडे, माजी पंचायत समिती सदस्य श्यामराव माळी, सावता महाराज मित्र मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी दशरथ फुलसुंदर, संजय फुलसुंदर, शैलेश फुलसुंदर, मंदा खराडे, संतोष फुलसुंदर, नयन फुलसुंदर, लक्ष्मण फुलसुंदर, दीपक डोंगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत कसबे व अरविंद पंडित यांनी केले. पुनम दुधवडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT