पुणे

काकडपट्टा येथे बचावली दोन मुले

CD

पिंपळवंडी, ता.८ : येथील काकडपट्टा (ता.जुन्नर) शिवारात सोमवारी (ता.८) संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले थोडक्यात बचावली.
सत्यवान रघुनाथ काकडे व त्यांच्या पत्नी बेबी काकडे तसेच मुलगी कांचन गुंजाळ या समर्थ (वय २) व लोकेश (वय ३) या लहान मुलांना सोबत घेऊन बसले होते. यावेळी वीज पुरवठा खंडित झालेला होता. यावेळी बिबट्याने साडेसातच्या दरम्यान लहान मुलावर झेप मारली. प्रसंगावधान राखत त्यांच्या आईने मोठ्याने ओरडत समर्थ व लोकेश या दोघांना पाठीमागे ओढले व सुरक्षित ठिकाणी नेले. अगदी तीन ते चार फुटावरून बिबट्याने ही झेप मारली असल्याचे बेबी काकडे यांनी सांगितले. मोठ्याने आवाज झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.मुलगा आमच्या जवळ नसता तर अनर्थ घडला असता, असे त्या म्हणाल्या.
बिबट्याच्या या हल्ल्याने घरातील सदस्य भयभीत झालेले आहेत. घरासमोर बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून जर लहान मुलं नजरेआड गेली तर भविष्यात अनुचित प्रकार घडू शकतो. काकडपट्टा येथे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याची शिकार केलेली होती. तसेच दररोज बिबट्याचे दर्शन परिसरात होत असते. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

02593

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; India A कडून खेळण्याचा अद्याप निर्णय नाही

Latest Marathi News Updates: गणेश विसर्जनात कृत्रिम तलावांसाठी बीएमसीकडून लाखो लिटर पाण्याचा वापर

Shoumika Mahadik : मागची ४ वर्षे गोकुळच्या वार्षिक सभेला शौमिका महाडिकांची खुर्ची कोपऱ्यात, यंदा मात्र थेट मध्यभागी; सभा वादळी...

Shivaji Maharaj : कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...आजही शिवभक्त घेतात दर्शन!

Mumbai Local: लोकल कोंडीतून सुटका कधी? ‘एमयूटीपी’वर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च; गर्दी कायम

SCROLL FOR NEXT