पुणे

काळू धबधबा येथे अभियंताचा मृत्यू

CD

पिंपळवंडी, ता.१५ : माळशेज घाटाजवळील काळू धबधबा येथे रविवारी (ता.१४) फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील अभियंता हिमलकुमार बिनोदकुमार सिंग (वय २३, रा.खराडी) या तरुणाच्या डोक्यात दरडीतील दगड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्या सोबत असलेला अंशुमन मौर्य (वय २३) हा जखमी झाला आहे.
पुण्यातील एका ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून हे दोघेही काळू धबधबा फिरण्यासाठी आलेले होते. सकाळी ट्रेक करून सर्व पर्यटक हे काळू धबधबा येथे पोहोचले येथे काही काळ थांबल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर अचानक वरून आलेल्या दरडीतील एक दगड हिमलकुमार सिंग यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक तरुण व टोकावडे पोलिसांच्या सहायाने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ट्रेक करणे अत्यंत धोकादायक
काळू धबधबा हा माळशेज घाटा जवळ असून पाच टप्प्यात कोसळत असल्याने ते दृश्य अतिरमणीय दिसत असते. मागील काही वर्षात हा धबधबा बघण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. थितबी या गावातून जात असताना काळू नदी पार करून या धबधब्याच्या शेवटी पोहोचता येते. वाटेत खोल पाण्याचे डोह, निसरडी वाट आदी धोके पार करत येथे जावे लागते. यापूर्वी येथे पर्यटक मृत्युमुखी पडल्याच्या तसेच नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने शेकडो पर्यटक अडकल्याच्या घटना याठिकाणी झालेल्या आहेत. असे असताना देखील या परिसरात प्रशासनाचा कोणताही व्यक्ती धबधबा ज्याठिकाणी कोसळतो त्याठिकाणी नसतो. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर लक्ष देण्यासाठी येथे कोणीतरी असणे आवश्यक आहे असे अनेक पर्यटकांचे मत आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांवर कोणाचेही बंधन नाही. या परिसरात वाढत चाललेल्या पर्यटक संख्येवर आळा घालण्यासाठी नियम करून ती संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांचे मृत्यू होऊ शकतात. पर्यटकांनी देखील याठिकाणी भेट देत असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ट्रेक आयोजित करणारे ग्रुप हे शेकडोंच्या संख्येने पर्यटक घेऊन जात असतात त्यावर देखील प्रशासनाने निर्बंध आणणे गरजेचे आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळाची माहिती घेणे आवश्यक आहे.तेथे असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन ट्रेक करणे आवश्यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT