पुणे

रोहितच्या मृत्यूमुळे स्थलांतरितांचा जीवघेणा संघर्ष ऐरणीवर

CD

सिद्धार्थ कसबे
पिंपळवंडी,ता.१७ : जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून कांदा लागवडीसाठी जुन्नरमध्ये आलेल्या स्थलांतरित शेतमजूर कुटुंबातील हा मुलगा होता. आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहितने जीव गमावला, ज्यामुळे स्थलांतरित मजुरांच्या असुरक्षित जीवनाचे आणि प्रशासकीय उदासीनतेचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
रोहितचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासह जुन्नरमध्ये आले होते. शेतात बांधावर बसलेल्या रोहितवर बिबट्याने अचानक हल्ला केला. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईने जिवाचे रान केले; परंतु बिबट्याचे सुळे मानेत घुसल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. शाळेत जाण्याच्या वयात रोहितला आई-वडिलांसोबत मजुरीसाठी बाहेरगावी यावे लागले होते. ही घटना केवळ एका बिबट्याच्या हल्ल्याची नाही, तर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि जीवघेण्या परिस्थितीत जगणाऱ्या अनेक मुलांची आहे.
रोहितसारखी अनेक लहान मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आई-वडिलांना मजुरीसाठी परगावी जावे लागत असल्याने आणि गावी मुलांना सांभाळायला कोणी नसल्याने, ही मुले त्यांच्यासोबतच येतात. शिक्षणापासून दूर असलेली ही पिढी अत्यंत खडतर जीवन जगत आहे. त्यात बिबट्याच्या सततच्या भीतीखाली त्यांना जगावे लागते. एकविसाव्या शतकातही शिक्षणापासून दूर असलेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यांना त्यांचे हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हा केवळ दिखावा...
जुन्नर तालुक्यात बिबट्याची भीती सर्वत्र असतानाही, ऊसतोड आणि शेतमजुरीसाठी आलेले लोक शेतांमध्ये तात्पुरत्या झोपड्या करून राहतात. त्यांची मुले उसाच्या बाजूला उघड्यावर फिरत असतात. हे चित्र नेते, पुढारी आणि वनविभागाचे अधिकारी या सर्वांना दिसत असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही उपाय केले जात नाहीत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यावरच सर्व पुढारी, नेते, कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ‘हे करा, ते करा’ असे सल्ले देतात. हा केवळ दिखावा असून, प्रत्यक्ष कृतीचा अभाव स्पष्ट दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हे आहे गरजेचे
बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे
विशेषतः पालकांनी लहान मुलांची योग्य काळजी घेतली पाहिजे
शेतात काम करणाऱ्या स्त्रियांनी सतत जागरूक राहून काम करावे
जे लोक शेतात, उघड्यावर कोप्या करून राहत आहेत, त्यांच्या राहण्याची सोय करणे गरजेचे आहे
ज्या शेतकऱ्यांकडे मजूर कामाला येतात, त्या शेतकऱ्यांनी त्यांना बंदिस्त आणि सुरक्षित राहण्याची सोय करावी
साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांसाठी सुरक्षित हंगामी निवाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
मुलांच्या शिक्षणाकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे
सक्तीचे शिक्षण असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणापासून वंचित कशी राहू शकतात, हा एक मोठा प्रश्न आहे.

सरकारी यंत्रणेची कुचकामी भूमिका
बिबट्याबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना, केवळ बिबट्यामुळेच मृत्यू कसे होत आहेत यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, या मृत्यूंमागे सरकारी यंत्रणेची कुचकामी भूमिका आणि सामाजिक उदासीनता यांचाही सहभाग आहे यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बिबट प्रवण क्षेत्रात राहत असताना आणि हल्ल्यांच्या घटना घडल्याचे माहीत असतानाही अनेक नागरिक लहान मुलांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येते. कितीही बिबटे पकडले तरी त्यांची संख्या लवकर कमी होणार नाही, त्यामुळे बिबट्यापासून बचावासाठी स्वतःच स्वतःची काळजी घेणे आणि प्रशासनाने मूलभूत सुविधा व सुरक्षा पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : कुंद्रा दाम्पत्यावर फसवणुकीचे कलम

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

SCROLL FOR NEXT