पुणे

पारगाव मेमाणे येथे बिबट्याचा उच्छाद

CD

पारगाव मेमाणे, ता.२० : पारगाव मेमाणे (ता.पुरंदर) येथे तीन बिबट्यांनी मागील सहा महिन्यांपासून उच्छाद मांडला आहे. त्यांच्या दहशतीने शेतकरी, ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकरी, ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढल्याने त्यास त्वरित जेरबंद करावे. अन्यथा वनविभागाच्या विरोधात आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

वनविभागाकडून त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कारवाई होत नसल्याने ''भय इथले संपत नाही'' असे अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून तीन बिबट्यांचा या भागात असलेला हिंसक वावर या प्रश्नांनी येथील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वी काका सावंत यांच्या दारातील पाळीव श्‍वान तसेच धनंजय भैरवकर यांच्या गोठ्यातील वासरचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. नुकतेच नारायण जाधव यांची शेळी व खंडू मेमाणे यांची बकऱ्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
दरम्यान, पोलिस पाटील शांताराम सावंत, माजी सरपंच सर्जेराव मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, जितेंद्र मेमाणे तंटामुक्ती अध्यक्ष संपत मेमाणे, शहाजी मेमाणे इत्यादींनी तालुका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जुजबी कारवाई केली जाते.

लहान लेकराप्रमाणे गाईचे दूध पाजून मोठे केलेल्या बकऱ्याची बिबट्याने केलेली अवस्था बघून, मनाला खूप हळहळ वाटते. पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. यामुळे वनविभागाने बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा.
- खंडू साहेबराव मेमाणे, स्थानिक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT