पुणे

वरवंड येथे ज्येष्ठाचा खून

CD

वरवंड, ता. ७ : वरवंड (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. ७) पहाटे घराबाहेर आलेल्या एका व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून झाला. हुसेन अलिसो तांबोळी (वय ६०), असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, हुसेन तांबोळी हे वरवंड येथील पुनर्वसन भागात पत्नी सोबत राहत असत. मंगळवारी पहाटे चार वाजता ते घराच्या बाहेर आले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारे वार केले. डोक्यात दोन वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पद्मराज गंपले, स्वप्नील लोखंडे, प्रशांत मदने, संजय नागरगोजे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाहणी करून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. परिसराची बारकाईने पाहणी केली. दुपारी अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथक आदींनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी काही जणांची पोलिसांनी कसून तपासणी केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT