पुणे

इंद्रायणी

CD

इंद्रायणी वाचवा !

पवित्र इंद्रायणी नदीला जर धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे तर कीर्तनकार, प्रवचनकार तिचे हे विदारक स्वरूप उघड्या डोळ्यांनी कसे पाहू शकतात. इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा गावोगावच्या प्रशासनात तसेच नागरिकांमध्ये प्रबोधन करून मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. प्रदूषण करणारे आपणच आहोत, याची जाणीव प्रत्येकाला डोळसपणे व्हायला हवी. तरच संभाव्य काळात निसर्गाचा समतोल राहील. अन्यथा, इंद्रायणीची झालेली गटारगंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही.
- विद्या अरुण काशीद, इंदोरी


इंद्रायणी काठी । देवाची आळंदी
लागली समाधी। ज्ञानेशांची।।

अशी महती असलेली इंद्रायणीचा उगम आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लोणावळ्याजवळील कुरवंडे गावातून. तेथून प्रवाहित झालेली ही जीवनदायिनी इंद्रायणी पुढे भीमा या नावाने तर पंढरपूरजवळ ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील संत मांदियाळीने इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे उल्लेख आपल्या अभंगातून केले आहेत. तसेच अनेक कवींनी तिचे गुणगान आपल्या कवितेतून वर्णन केले आहेत. त्यातून या नदीची महती अधोरेखित होते. ज्ञानेश्वर महाराज याच इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवन समाधीत आहेत. तर वारकरी संप्रदायाचे कळस असलेले संत तुकाराम महाराज यांचे देहूगावही याच इंद्रायणीच्या तीरावर आहे. तुकोबारायांची साधना आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या प्रबोधनाची इंद्रायणी साक्षीदार आहे.

पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला
भक्तिभावाने एक रूप झाला
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला
एका जनार्दनी इंद्रायणी आठव
उजळूनी निघाले आळंदी हे गाव

असा उल्लेख संत एकनाथ महाराज करतात. तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीप्रसंगाला इंद्रायणी नदीला साक्षी ठेवतात.
तर
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी
असे संत नामदेव महाराज सांगतात. म्हणजेच संतांबाबतचे चांगुलपण विशद करण्यासाठी सकल संतांनी पवित्र इंद्रायणीचा नामोल्लेख केला आहे. त्यातून तिची महती सिद्ध होते.

नदीचे पाणी हेच तीर्थ
आपण नदीला जीवनदायिनी का म्हणतो, तर ती समस्त प्राणिमात्रांना जीवन देणारी असते. संत ज्याप्रमाणे सर्वांप्रती समभाव राखतात, अगदी त्याचप्रमाणे नदीही सर्वांसाठी एकच समत्वभाव जपते. त्यामुळेच पूर्वी संत, साधू, मुनी हे नदीला देवस्वरुपातच पूजत असत. तिला आईस्वरुप मानत असत. त्यामुळे पूर्वी ही आपली इंद्रायणी स्वच्छ होती. कोणतीही प्रक्रिया न करता बिनधास्तपणे लोक तीर्थ म्हणून हे जल पीत होते. त्याचे कारण नदीची महती, तिचे मोठेपण सर्वांना माहीत होते. पण काही वर्षांपासून नदीचे पावित्र्य धोक्यात आले. एक काळ असा होता की मावळ पंचक्रोशीतील तुकोबांचे कानी पडणारे टाळ मृदंगाचे बोल आणि जिवाला सुख: आणि दुःखात नवी उमेद देणारे तुकोबांचे अभंग मन प्रसन्न करायचे. इंद्रायणीच्या थंडगार पाण्याने शरीरावर रोमांच उभे राहायचे.

मावळकरांसाठी वरदायिनी
जन्मभूमी असलेल्या मावळमध्ये इंद्रायणीचे रूप अतिशय सुंदर आणि विलोभनीय होते. कुरवंड्यासारख्या छोट्याशा गावातून उगम पावलेली ही नदी लोणावळा, कार्ला, कामशेत, सांगवी, आंबी, इंदोरी, देहू, मोशीवरून आळंदीत प्रवाहित होते. आळंदी, मरकळवरून ती तुळापूर येथे भीमा, भामा, यांच्यात विलीन होते. भीमा-भामा-इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम याच ठिकाणी होतो. तेथून पुढे तिला भीमा असे नाव पडले. मावळातील भाग सुजलाम्, सुफलाम् होण्याचे एकमेव कारण इंद्रायणीच आहे. पिण्याचे पाणी देण्याबरोबर पिकांसाठी ही नदी मावळकरांना वरदायिनी ठरली. मावळात कृषी तंत्रज्ञान रुजायला लागले. त्याची आज भरभराट झाली आहे. पूर्वी भातशेती हेच एकमेव पीक घेणारे शेतकरी तिच्याच जिवावर आधुनिक फुलशेती, स्टॉबेरी लागवड करू लागले आहे. पॉलिहाउसचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

इंद्रायणीत सांडपाणी
जागतिकीकरणाच्या वाऱ्यामुळे मात्र सारे वातावरण बदलून गेले. मोठ्या प्रमाणात उद्योगांची भरभराट झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होऊ लागली. मात्र, त्यातून सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे पवित्र इंद्रायणीला अपवित्र करून टाकले. आपल्या जन्मठिकाणीच आपल्याच स्वकियांनी तिचे चरित्रहनन केले. तिच्या स्वरूपाला रसायनाचे चटके देऊन तिचे अस्तित्व संपविण्याचा अघोरी डाव नागरिकांनी केला. तरीही इंद्रायणी थांबली नाही. वाहतेच आहे, रसायनांचे चटके कमी म्हणून की काय गावोगावचा मैला,गटारीचे पाणीही तिच्यात सोडले जात आहे. जिच्या जिवावर तुमचा भविष्यकाळ आहे, तिची काळजी कोणालाच नाही. प्रत्येक गावातले सरपंच, सर्व नेतेमंडळी, अंध समाजाने कधीतरी या पवित्र इंद्रायणीच्या तीरावर जाऊन बसावे आणि तिचे बदलेले स्वरूप पाहावे, तेव्हाचे विदारक रुप मनाला पटते का ते अंतर्मनाला विचारावे. आपण अस्थिविसर्जन इंद्रायणीमध्ये करतो, का तर मुक्ती मिळते. इतक्या घाण पाण्यात मुक्ती मिळणे शक्यच नाही. वारकरी संप्रदायातील लोक पुलावरून जाताना नदीत पैसे टाकतात. नमस्कार करतात. मोठ्या अभिमानाने सांगतात आम्ही पवित्र इंद्रायणीच्या तीरी राहतो. पण या गंगा स्वरूप इंद्रायणीला गटारगंगेच्या आलेल्या स्वरूपाला कोण जबाबदार आहे, याचा कोणीच विचार करीत नाही. समाजाचे विदारक प्रतिबिंब इंद्रायणीला देत असलेल्या वागणुकीतून पाहायला मिळते.

इंद्रायणी सुधार व्हायला हवा
इंद्रायणीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तिला नमस्कार नाही केला, तिला पैशाचे आमिष नाही दाखवले तरी तिची तुमच्यावरील माया तसूभरही कमी होणार नाही. पण तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्व थरातील लोकांनी एकत्र यायला हवे. विज्ञान आणि अध्यात्माचे वारे सध्या मोठ्या वेगाने वाहत आहे. पण या दोन्हींचे पुरस्कर्ते मात्र इंद्रायणी प्रदूषणाबाबत मूग गिळून गप्प आहेत. विज्ञानाने इतका विकास केला आहे तर गावातील सांडपाणी गावातच जिरवण्यासाठी का नाही अत्याधुनिकेतेचा विचार केला जात.

तेथे पेरिले नुगवे शेती।
अस्थी विरती तेथे उदकी।।
चंद्रभागा चक्रतीर्थ।
भीमा समर्थ इंद्रायणी।।
आळंदीमध्ये इंद्रायणीच्या पाण्यात अस्थीसुद्धा विरघळतात, असे निळोबाराय अभंगात वर्णन करतात.

सामुहिक प्रयत्न हवेत
पापाचा नाश करणाऱ्या समर्थ इंद्रायणीला जर धार्मिकदृष्ट्या इतके महत्त्व आहे तर कीर्तनकार, प्रवचनकार तिचे हे बदललेले स्वरूप उघड्या डोळ्यांनी कसे पाहतात. इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा गावोगावच्या प्रशासनात तसेच नागरिकांमध्ये प्रबोधन करून मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. प्रदूषण करणारे आपणच आहोत, याची जाणीव डोळसपणे व्हायला हवी. तरच संभाव्य काळात निसर्गाचा समतोल राहील. अन्यथा इंद्रायणीची झालेली गटारगंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. हे काम एकट्याचे नाही त्यासाठी सर्वांचा पुढाकार हवा आहे. कोणाकोणाचा पुढाकार हवा असे विचारले तर मी म्हणेल. ज्याला-ज्याला पाणी प्यायला लागते त्या प्रत्येकाने इंद्रायणी सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Ranjani Cable Theft Case: रांजणीच्या खडकवाडीत केबलचोरीचा कहर; ५५ शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान, पोलिस तपासाची मागणी तीव्र

SCROLL FOR NEXT