पुणे

काकड आरती समाप्तीचा नऱ्हे येथे रंगला सोहळा

CD

भोर, ता. २८ : नऱ्हे (ता. भोर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १ महिन्यापासून चाललेल्या काकड आरतीची समाप्ती झाली.
या निमित्त पंचामृताने सकाळी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. या पूजेचा मान कांचन राजेंद्र गोळे व ज्योती जयराम वीर यांना दिला. त्यानंतर गावातून भजन गात काकड्याचे नदीत विसर्जन केले. दुपारी सत्यनारायण महापूजा झाली. पूजेसाठीचा मान आश्विन व अमोल जगन्नाथ गोळे आणि मिताली व राहुल विश्वनाथ गोळे या दांपत्यांना होता. त्यानंतर गावाच्या वतीने युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचे संतपूजन विश्वनाथ ज्ञानोबा गोळे व आमदार संग्राम थोपटे यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ पांडुरंग गोळे यांच्या हस्त केले. गावातील रुक्मिणी ज्ञानोबा गोळे (वय ९०) व शांताबाई पांडुरंग गोळे (वय ९०) यांची मातृतुला धान्याच्या स्वरूपात केली. तांदूळ, ज्वारी, गहू आदी धान्य आळंदी (ता. खेड) येथील संत वारकरी शिक्षण मंडळास दान केले. त्यानंतर सुरेश महाराज सूळ (अकलूज) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी मंदिरात महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : भविष्यात पोलिसांसाठी चांगल्या घरांची निर्मिती करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मोहोळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्टेशनवर माफिया आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरांचे वर्चस्व; शिवसेनेकडून गंभीर आरोप

Donald Trump: ब्रिक्स देश डॉलरविरोधी; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, आयातशुल्काची पुन्हा धमकी

'या' कारणामुळे झालेला संजीव कुमार यांचा मृत्यू; अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला, 'रात्री २ वाजेपर्यंत खायचे आणि हाडं...

Smart Electricity Meter: मोबाईल स्मार्ट झाले, मग वीज मीटर स्मार्ट का नको? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT