पुणे

गुनाटच्या माजी उपसरपंचावर बिबट्याचा हल्ला

CD

गुनाट, ता. १६ : येथील (ता. शिरूर) माजी उपसरपंच रमेश गाडे यांच्यावर सोमवारी (ता. १६) पहाटे उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्या रमेश व त्यांचे बंधू योगेश गाडे यांनी प्रतिकार केल्याने त्याने धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या पंजाचा निसटता वार रमेश गाडे यांच्या चेहऱ्यावर लागल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल गणेश म्हेत्रे, वनसेवक नवनाथ गांधले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले.


शेती आणि शेतकरी यांच्यात सध्या बिबट्या व महावितरण मोठा अडथळा ठरत आहे. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्या कधी कोठून हल्ला करील याची शास्वती नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना जिवावर उदार होऊन काम करावे लागते. नशीब बलवत्तर म्हणून काल जीव वाचला. पण बिबट्याच्या हल्ल्याचा प्रश्न कायम आहे, असे शेतकरी योगेश गाडे यांनी सांगितले.

दरम्यान, विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्रपाळीत जीव धोक्यात घालून भरण्यासाठी जावे लागते. त्यात बिबट्याच्या हल्ल्याचे भयाने शेतकरी रात्रपाळीतही शेतावर जाण्यास कचरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला दिवसपाळीत वीज उपलब्ध करून द्या, अशी मागणी न्हावरे येथील महावितरणकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातसाठी खास जीआर, मराठवाड्याच्या हक्काचं ३९ लाख लीटर पाणी दिलं संस्थानला; ४८ किमी पाइपलाईन, पायघड्या कुणाच्या आशीर्वादाने?

Team India Schedule: टीम इंडिया इंग्लंडपूर्वी जाणार 'या' देशाच्या दौऱ्यावर; BCCI ने जाहीर केलं T20I मालिकेचं वेळापत्रक

Sangli ZP Election Politics : 'भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्षे आणि किती वेळा उंबरे झिजवले, याचा मी साक्षीदार'; संजय पाटलांचा जयंत पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : पुण्यात मोठी कारवाई; ७२ किलो गांजासह कार जप्त, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

Success Story : नोकरी सांभाळून शेतीतून लाखोंची कमाई! दापोलीच्या 'या' अवलियाने पारंपरिक शेतीचा चेहराच बदलला

SCROLL FOR NEXT