पुणे

विजेच्या खांबाला धडकल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

CD

पुणे : विजेच्या खांबाला धडकल्याने दुचाकीच्या मागील सीटवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथील कालवा रस्त्यावर घडली. तर, अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
कार्तिकसिंग ठाकूर (वय २४, रा. आंबेगाव बुद्रूक) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार दर्शन रमेश कौटकर (वय २३, रा. जयप्रकाशनगर, नागपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार सुनील साळुंके यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दर्शन आणि त्याचा मित्र कार्तिकसिंग शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कॅनॉल रस्त्याने जात होते. दर्शनचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकसिंगचा मृत्यू झाला.

एक कोटीचे दागिने घेऊन सेल्समन पसार
पुणे : रविवार पेठेतील एका सराफा दुकानातील सेल्समनने एक कोटी १५ लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम अमृतलाल बाफना (रा. गिरगाव, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सराफा व्यावसायिक जितेंद्र धनराज सोनिग्रा (वय ४५, रा. मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनिग्रा हे शहरातील छोट्या सराफांना दागिन्यांची विक्री करतात. विक्रम हा सोनिग्रा यांच्या दुकानात सेल्समन म्हणून कामास होता. सोनिग्रा यांनी विक्रमला एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांच्या २४५ सोनसाखळ्या विक्रीसाठी दिल्या होत्या. परंतु त्याने दागिने विक्री न करता फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT