पुणे

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शुक्रवारी व्याख्यान

CD

पुणे ः वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या व्याख्यानाचा आणि सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या कार्यक्रमात न्यायमूर्ती चपळगावकर यांचे ‘मला घडविणाऱ्या गोष्टी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच, ‘मसाप’तर्फे चपळगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

निसर्गाच्या छटा दर्शवणारे प्रदर्शन आजपासून
पुणे ः पावसाच्या आगमनासह पशू-पक्षी, प्राणी, झाडे आदींच्या प्रफुल्लित झालेल्या विविध छटा आपल्याला निसर्गात पाहायला मिळतात. याच छटा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पावसावर आधारित ‘कलर्स ऑफ शॉवर मान्सून शो’ अंतर्गत चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन आजपासून आयोजित करण्यात आले आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या हॅपी कॉलनी व सातारा रस्ता येथील कलादालनात हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १६) सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत खुले आहे. या प्रदर्शनात पन्नास चित्रकार व पंधरा छायाचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनात शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) हॅपी कॉलनी व सातारा रस्ता येथे सायंकाळी ५ वाजता चित्राचे प्रात्यक्षिक आणि सातारा रस्ता येथे मोबाईल फोटोग्राफी’वर चर्चासत्र होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT