पुणे

तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशनच्या सहा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

CD

बारामती, ता. ८ ः येथील तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्ही. एफ. एक्स या संस्थेने गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना हमखास नोकरीची संधी मिळवून दिली आहे. एका वेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करावे या साठी प्रशिक्षण देत त्या नंतर त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे दुहेरी काम तिरंगाच्या वतीने होत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी दिली. 
हल्ली नोकरीची संधी मिळविताना युवकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. मात्र, तिरंगा कॉलेजमध्ये प्रशिक्षणासोबतच बहुसंख्य विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यात संस्थाचालकांना यश मिळाले आहे. 
तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्ही. एफ. एक्स मधील ऋतुजा बाबर, दिगंबर वनकांबळे, दर्शन बाबर, जय यादव, अजय वाघे, तेजा सरगर, शिवप्रसाद साबळे या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी नुकतीच प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित शिंदे व सचिव रजनी शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

आपली यारी… गावावर भारी! ‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

Crime on Rickshaw : बेशिस्‍त रिक्षाचालकांना वाहतूक पोलिस, आरटीओकडून कारवाईचा ‘डोस’; ३७५ रिक्षा चालकांवर कारवाई

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

SCROLL FOR NEXT