पुणे

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढणार?

CD

पुणे, ता. १९ : जिल्ह्यातील मतदारसंघात साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होते, मात्र त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलले आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येतो, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रशासनाने दृढ निश्‍चयच केला आहे. मतदार जनजागृतीसह मतदान केंद्रांवर विविध सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर मागील तीन विधानसभा निवडणुकांत सरासरी ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. तर कमी मतदान होणारे भाग निश्‍चित करून तेथील मतदानात वाढ होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
मतदार मतदान करण्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आत्तापर्यंतच्या निवडणुकांतील टक्केवारी बघितल्यानंतर लक्षात येते. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र करण्यात आली, तसेच पिण्याच्या पाण्यापासून ते वाहनांच्या पार्किंगपर्यंतची व्यवस्था करण्याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. मागील तीन विधानसभा निवडणुकांच्या टक्केवारीमध्ये २०१४ मध्ये इंदापूर मतदारसंघात सर्वाधिक ७८ टक्के मतदान झाले होते. तर गत पंचवार्षिकमध्ये इंदापूर मतदारसंघात ७६.३४ टक्के सर्वाधिक मतदान झाले. ६५ टक्क्यांहून अधिक मतदान हे सात मतदारसंघात तर साठ टक्क्यांहून अधिक मतदान एका मतदारसंघात झाले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मतदानाची टक्केवारीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनीदेखील चिंता व्यक्त केली होती. प्रशासनासमोर आता ही टक्केवारी वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. प्रशासनाने सर्वाधिक भर हा मतदान जनजागृतीवर दिला, त्याचबरोबर ज्येष्ठ, दिव्यांग, महिला मतदारांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने हे केले
- विविध प्रसार माध्यमातून जनजागृती
- महाविद्यालये, मॉल, दुकान आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली
- शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रे लिहिली
- प्रशासनाकडून ८५ टक्के मतदान चिठ्ठ्यांचे वाटप
- सोसायट्यांमधील मतदान वाढीसाठी १२६ सोसायटीमध्येच मतदान केंद्र
- स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पुढाकार
- मतदानाची शपथ, महिला रॅली काढण्यात आली
- दृष्टिहीन मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप
- प्रत्येक मतदारसंघात ज्येष्ठांसह दिव्यांगांना मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था
- १० लाख ५४ हजार मतदान कार्डचे वाटप करण्यात आले


चौकट
मागील तीन वर्षांची मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ - २००९ - २०१४ - २०१९
इंदापूर - ७६.६० - ७८.७४ - ७६.३४
बारामती- ६४.८२ - ७३.६२ - ६८.२७
पुरंदर- ६५.६६ - ७०.५९ - ६५.७४
भोर - ६६.७२ - ६८.७१ - ६३.१०
खेड - ६४.५३ - ७०.६७ - ६७.३८
आंबेगाव - ६८.८८ - ७१.६५ - ६६.८७
जुन्नर - ६३.३६ - ७१.४० - ६७.५२
शिरूर - ६४.२८ - ६९.६४ - ६७.३१
दौंड - ६९.१३ - ७३.३२ - ६९.१६

कोट
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढली. या विधानसभा निवडणुकीतदेखील मतदानाची टक्केवारी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मतदान केंद्रांवर रांगा लागणार नाही याचे नियोजन केले आहे. मतदार जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आले, त्यामध्ये मतदारांचा सहभाग होता.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT